करमाळाक्राइम

करमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..

करमाळा(प्रतिनिधी) ; रमाळा तालुक्यातील कोळगाव येथील दहावीला असणारी एक अल्पवयीन मुलगी मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करता करता फेसबुकद्वारे एका जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तरुणांच्या संपर्कात आली आणि त्याच्या प्रेमात पडली.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट , मग मैत्री , मग चॅटिंग ते प्रेम आणि मग थेट भेटीची ओढ.! अशा सर्व प्रकारातून कोळगावची मुलगी त्या प्रियकराला भेटायला थेट भुसावळ तालुक्यातील एका गावात पोहचली पण नेमकं तो तरुण शेतात गेलेला होता.

हेही वाचा- बार्शीचे आमदार राऊत यांचे पुत्राच्या लग्नाला हजारोंची गर्दी; पण गुन्हा मात्र ‘त्या’ एकाच व्यक्तीवर

पूर आला आणि आगर व्यवस्थापक साडेसात लाखांची रोकड घेऊन ९ तास बसले एसटीच्या टपावर; कर्तव्यदक्षतेला सलाम.!

गावातील इतर तरुणांनी ही वार्ता गाव पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी त्या तरुणीला भुसावळ पोलिसांच्या हवाली केले.

इकडे मुलगी परांड्याला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही, म्हणून घरच्यांनी शोध घेऊन, रडून , काळजी करून शेवटी करमाळा पोलीस स्टेशन गाठले पण तोवर भुसावळ पोलिसांनी या तरुणी बाबत करमाळा पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली होती.

तेव्हा मुलगी भुसावळला पोलीस ठाण्यात आहे हे ऐकून पालक चक्रावले पण मुलगी सुरक्षित आहे हे ऐकून स्थिर झाले. व पालकांनी भुसावळला धाव घेतली.

हेही वाचा- नर्सची आत्महत्या: सोलापूर महामार्गालगत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले

करमाळा पोलिसांनी मुलीच्या पालकांना तुमच्याकडे पाठवत आहोत असा संदेश भुसावळ पोलिसांना दिला आणि पालक भुसावळला पोहचले. पालकांची योग्य खात्री पटवून पोलीसांनी मुलीला पालकाच्या ताब्यात दिले.

जाहिरात

सध्या ऑनलाईन शिक्षणासाठी मुलामुलींच्या हातात अँड्रॉइड मोबाईल देताय पण आपली मुलं मुली नक्की काय अभ्यास करतात याकडे ही पालकांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे, हेच या घटनेतुन सर्व पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

litsbros

Comment here