आरोग्यकरमाळामनोरंजनशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे समाजभान; लघुपट बनवून केली कोरोना प्रतिबंधक जनजागृती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे समाजभान; लघुपट बनवून केली कोरोना प्रतिबंधक जनजागृती

स्वतः व्हिडीओ क्लिप तयार करुन यु ट्युबवर केला व्हायरल

जेउर (प्रतिनिधी) ; सध्या वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात गाव स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.विशेषतः गाव स्तरावरील या जनजागृतीच्या चळवळीत आपलाही खारीचा वाटा म्हणून करमाळा तालुक्यातील खडकेवाडी ( देवळाली ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्यांनी कोरोनावर आधारीत जनजागृती करणारी एक व्हिडिओ क्लिप तयार करुन त्यामधून सर्व ग्रामस्थांना कोरोनापासून संरक्षणासाठी राबवावयाच्या त्रिसूत्रीचा संदेश प्रभावीपणे दिला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील माझं गाव…कोरोनामुक्त गाव…या विशेष अभियानांतर्गत सध्या जिल्ह्यात जनजागृतीसाठी जिल्हा , तालुका व ग्रामपंचायत स्तरावला विविध उपक्रम राबविले जात आहेत.या उपक्रमांतर्गत मास्क वापरणे , हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

म्हणूनच करमाळा तालुक्यातील खडकेवाडी ( देवळाली ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोरोना इयत्ता सातवीतील शुभम बाळू जाधव या विद्यार्थ्यांने स्वतःच पटकथा लिहून आणि दोन मित्रांच्या सहाय्याने फक्त तीन पात्रांची एक व्हिडीओ क्लिप तयार करुन युट्युबवर अपलोडही केली आहे.त्याला दर्शकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

सदर व्हिडिओ क्लिपमध्ये शुभम बाळू जाधव, आदित्य दयाराम जाधव आणि प्रसाद सुभाष जाधव या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये मास्क वापरणे , हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसुत्री कशी गरजेची आहे याबद्दल अतिशय उत्तम व प्रभावी अशी भूमिका साकारली आहे.

या शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करण्याविषयी कोणतेही तंत्रशुद्ध ज्ञान अवगत नसतानाही एक सामाजिक संदेश देण्याचा चांगला प्रयत्न केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या शाळेच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता हुंडेकरी यांच्या प्रेरणेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वीही लॉकडाऊन काळात भारुडाच्या माध्यमातून तसेच घरगुती पद्धतीने मास्क कसा बनवावा या विषयांवरील व्हीडीओ तयार करून जनजागृती केली आहे.

कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या व्हिडीओ क्लिपबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) संजयकुमार राठोड , गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी अनिल बदे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे सचिन सोनवणे, देवळालीचे ग्रामविकास अधिकारी श्रीधर नागरसे , केंद्रप्रमुख महादेव यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उंदरगावच्या भोंदूबाबाच्या मेळाव्यात हजेरी; हेच का पुरोगामीत्व.? करमाळा तालुक्यात चर्चा

अखेर करमाळा पोलीस निरक्षक श्रीकांत पाडूळे यांची कुर्डूवाडी येथे बदली, तर करमाळयाला ‘हे’ नवे पोलीस निरीक्षक

या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता हुंडेकरी, स्मिता भस्मे, शाम माने, वनिता बडे, दादासाहेब माळी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

litsbros

Comment here