करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

गर्भवती ऊसतोडणी महिलेला सुरू झाल्या मातृकळा, पण उसाच्या फडात अँबुलन्स जायला वाट नव्हती; शेवटी ‘ती’ आरोग्य सेविका ठरली देवदूत; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गर्भवती ऊसतोडणी महीलेला सुरू झाल्या कळा, पण उसाच्या फडात अँबुलन्स जायला वाट नव्हती; शेवटी ‘ती’ आरोग्य सेविका ठरली देवदूत; वाचा सविस्तर

केतूर (अभय माने) शेटफळ (ता करमाळा) येथील ऊसवाहतुकदार गणेश नाईकनवरे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील आवणी ता.शेवगाव येथील गणेश भिवाजी बरडे पत्नी पुजासह आक्टोंबर महिन्यात ऊसतोडणीसाठी आलेले. पत्नी पुजा गर्भवती असल्याने प्रसुतीचे दिवस भरत आलेले.

२६आक्टोबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून प्रसुती वेदना सुरू झाल्या. नऊ वाजण्याच्या सुमारास वेदना अतिशय त्रीव्र झाल्या परंतु नॉर्मल प्रसुतीचे चिन्ह नसल्याने सहकारी महिलेने ऊसवाहतुकदार नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध केली.त्यांनी १०८ नंबरवरून रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. परंतु मजूरांच्या कोप्यापर्यंत चारचाकी जाने शक्य नव्हते. यावेळी गावातील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू होते तिथे सेवेसाठी असलेल्या आरोग्य सेविका बी.व्ही.निर्मळ व आरोग्य सहाय्यक बी.एच माने यांना घटनेची माहिती दिली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य सेविका यांनी मला तिथे घेऊन चला मी प्रयत्न करते म्हणाल्या. व नाईकनवरे यांच्या बरोबर थेट कोप्यावर गेल्या. महिलेची स्थिती अबनॉर्मल होती बाळ गुदमरले होते त्या महीलेला धीर देऊन उपलब्ध साधनाच्या मदतीने आपले कौशल्य पणाला लावून नॉर्मल प्रसुती करण्यात त्या यशस्वी झाल्या त्या लहान परीच्या रडण्याचा आवाज ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला वेळेत मदतीला आल्याबद्दल ऊसतोडणी मजूर दांपत्याने आभार मानले

फोटो ओळी,: शेटफळ ता करमाळा येथील ऊसतोडणी मजूरांचा कोप्यावर जाऊन केली प्रसुती झाल्यानंतर माता व बालकाबरोबर आरोग्य सेविका व्ही.बी.निर्मळ व आरोग्य साह्यक माने बी.एच.माने

litsbros

Comment here