केत्तूर येथे नेत्ररोग चिकित्सा शिबिर
केत्तूर (अभय माने) श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर (ता.करमाळा) व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्यामार्फत मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले.उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड.बाळासाहेब जरांडे हे होते.
यावेळी बोलताना डॉक्टर मोहम्मदभाई ठासरवाला म्हणाले की,” वाढते प्रदूषण, मोबाईल,टीव्ही ,भेसळीचे पदार्थ, सकस आहार न घेणे, व योग्य ती काळजी न घेणे यामुळे डोळ्यांचे विकार वाढत आहेत.सर्व अवयवाते,नयनम् प्रधानम या वुक्तीनुसार सर्व अवयवात डोळे हा अवयव महत्त्वाचा असल्याने डोळ्याची काळजी घ्यावी”असे आवाहन त्यांनी केले.यावेळी परिसरातील अबालवृध्दांनी या शिबिराचा लाभ घेतला.सुमारे 150 नागरिकांनी डोळे तपासून घेतले तर 26 लोकांना पुढील उपचाराच्या सूचना दिल्या.
दरम्यान सकाळच्या सत्रात शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील पार पडला शिबिरात तील डॉ.माया हजारे व राजेंद्र चांगण यांच्या समवेत प्राचार्य डी.ए.मुलाणी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऍड. बाळासाहेब जरांडे, माजी सरपंच उदयसिंह मोरे-पाटील, माजी उपसरपंच हरिश्चंद्र खाटमोडे,पोलीस पाटील गणपत पाटील,केंद्रप्रमुख विकास काळे,ऍड.अजित विघ्ने,प्रशांत नवले,संभाजी भोपते,शुभांगी विघ्ने, कीर्ती पानसरे,संचिता खोडवे, रेश्मा पाठक,अलका खोडवे, रामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक के.सी.जाधवर यांनी केले, तर आर.डी.मदने यांनी आभार मानले.
छायाचित्र -केत्तूर – मित्र चिकित्सा करताना नेत्ररोग तज्ञ
Comment here