शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा न करता वेळेत कर्जफेड करावी; तापे यांचे केतुर येथे प्रतिपादन

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा न करता वेळेत कर्जफेड करावी; तापे यांचे केतुर येथे प्रतिपादन

केत्तूर(अभय माने) केत्तूर तालुका करमाळा येथील एसबीआय बँक शाखेचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय शाखा सोलापूरचे शाखा व्यवस्थापक हरीश तापे हे उपस्थित होते. केत्तूर शाखाप्रमुख भावेश कुमार सोनवणे कॅशियर प्रवीण भडके व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

   यावेळी बोलताना तापे म्हणाले की, बँक शेतकऱ्यांना कर्ज देते परंतु कर्ज सरकार माफ करेल या अशेने शेतकरी ते कर्ज भरत नाही ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. 

वेळेवर बँकेचे कर्ज भरून शेतकऱ्यांनी बँकेला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना दिली व या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

     यावेळी प्रास्तविक अड.अजित विघ्ने यांनी केले तर सूर्यकांत पाटील,देवराव नवले उदयसिंह मोरे पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व व्यापारी व ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरां महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

karmalamadhanews24: