करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

केतूर येथील नेताजी सुभाष विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नेताजी सुभाष विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

केत्तूर (अभय माने) वाचनामुळे माणुस संवदनशील, प्रगल्भ शिवाय माणूस बनतो असे विचार हरिभक्त परायण व्याख्याते संजय बाबर यांनी व्यक्त केले.ते नेताजी सुभाष माध्य.व उच्चमाध्यमिक विद्यालय , केतूर (ता.करमाळा) येथे आयोजित “वाचन प्रेरणा दिना” निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.शाळेचे प्राचार्य डी.ए.मुलाणी अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक एस.बी.सामंत यांनी केले. प्रतिमा पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला काॕलेजच्या विद्यार्थीनी अमृता ठणके व ज्ञानेश्वरी गायकवाड यांनी डाॕ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्या जीवनविषयक विचार आपल्या मनोगतातून मांडले.

यावेळी व्यासपिठावर एस.एल.कुंभार, ए.एच. दुधभाते, बी.जी.बुरुटे, सौ.एल.एम. भोसले. सौ.पी.ए.गाडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.सहशिक्षक के.सी.जाधवर यांनी आभार मानले.

हेही वाचा- सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

आता गावागावांत होणार ‘संविधान सभागृह’ सोबतच ग्रंथालय व अभ्यासिका; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; वाचा किती मिळणार निधी

litsbros

Comment here