आरोग्यकरमाळा

करमाळा तालुक्यातील केतूर येथे महाआरोग्य शिबिरात 300 रुग्णांची तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील केतूर येथे महाआरोग्य शिबिरात 300 रुग्णांची तपासणी

केतूर (अभय माने) दोभाडा हॉस्पिटल च्या वर्धापन दिना निमित्त आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन . घाडगे कान नाक घसा तज्ञ करमाळा यांच्या हस्ते झाले.

उदघाटन वेळी डॉ आनंद खडके नेत्ररोग तज्ञ टेंभुर्णी , डॉ सुनील ढाके हृदयरोग व मधुमेह रोग तज्ञ बारामती , डॉ रोहित साळुंके त्वचारोग तज्ञ करमाळा, डॉ सौ स्वाती घाडगे दंतरोग तज्ञ, डॉ महेश भोसले अस्थिरोग तज्ञ करमाळा, डॉ सौ अपर्णा भोसले, डॉ कुदळे, डॉ मनेरी, डॉ सौ सारिका दोभाडा हे सर्व वैद्यकीय सहकारी उपस्थित होते.

सर्व उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी शिबिरातील रुग्णांची मोफत तपासणी केली.
केतुर व पंचक्रोशीतील जवळपास 30 गावातील 300 रुग्णांना 3 दिवसात या मोफत तपासणी शिबिराचा फायदा झाला.

यावेळी उदयसिंह मोरे पाटील, अजित विघ्ने , अशोक पाटील , राजू काका खाटमोडे, नवनाथ राऊत प्रवीण नवले , लक्ष्मीकांत पाटील, प्रशांत नवले, महादेव नगरे, पत्रकार राजाराम माने, महानवर सर सचिन जरांडे , मनोज कटारिया महेश महामुनी, किशोर वेळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे व गावातील सर्व मान्यवरांचे स्वागत दोभाडा परिवार यांच्या वतीने करण्यात आले.
उदयसिंह मोरे पाटील व अजित विघ्ने यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमासाठी व हॉस्पिटल साठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र चव्हाण यांनी केले
आभार प्रदर्शन डॉ जिनेंद्र दोभाडा यांनी केले.

litsbros

Comment here