करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे बापूंचे ब्रीदवाक्य आचरणात आणा; बापूंच्या प्रतिमेची केत्तुर गावातून मिरवणूक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे बापूंचे ब्रीदवाक्य आचरणात आणा; बापूंच्या प्रतिमेची केत्तुर गावातून मिरवणूक

केत्तूर (अभय माने) स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा 35 वा स्मृतिदिन नेताजी सुभाष विद्यालय केतुर दोन येथे मुख्याध्यापक दिलावर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.प्रास्ताविकात सुभाष सामंत यांनी बापूजी साळुंखे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

8 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण संस्थेमध्ये स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयातील लक्ष्मण महानवर यांनी बापूजींनी संस्थेचे जे ब्रीदवाक्य घेतले आहे ते ब्रीद वाक्य अचरनात आणावे असे सांगितले.

त्या ब्रीद वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. यावेळी पुतळ्याचे पूजन भिमराव बुरुटे प्रतिमा पूजन लक्ष्मण महानवर व विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन प्रा.सुभाष समांत व संस्थामाता सूशिलादेवी साळुंखे याच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती गाडे मॅडम यांनी केले.

विद्यालयातील अनेक मुला मुलींनी बापूजी साळुंखे यांच्या विषयी माहिती सांगितली. महानवर सर पुढे म्हणाले की, बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक मध्ये सुद्धा शाखा काढलेले आहेत या शाखांमध्ये हजारो विद्यार्थी घडवून अनेक उच्च पदावर गेलेले आहेत.

बापूजींनी मराठवाड्यात प्रवेश करून पहिलं संस्थेचे महाविद्यालय उस्मानाबाद येथे काढले व त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणी त्यांनी शाखा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे .

बापूजीनी जून 1960 मध्ये पोमलवाडी येथे आठवीचा वर्ग सुरू करून शाळा चालू केलेली आहे म्हणून आज आपण या विद्यालयात मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहोत.

बापूजींनी काढलेल्या शाखा विस्ताराविषयी सविस्तर माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी गावातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी पालक अजिनाथ निकत यांनी आपली जीप गाडी दिलेले होती.

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मदने व आभार श्रीमती साळी मॅडम यांनी मानले.

litsbros

Comment here