आरोग्यकरमाळाकेम

केम येथील विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

केम (संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम येथील पूजा जाधव वय 32 वर्ष या विवाहितेचा साप चावून मृत्यू झाला. हि घटना गुरूवारी सकाळी ७.३०मि घडली या बाबत सविस्तर माहिती अशी कि पूजा जाधव ही महिला स्वयंपाकाच्या चुलीसाठी सरपण आणण्यासाठी पठाड शिवारात गेली असता सरपण गोळा करताना सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान तिला सर्पाने हाताला दंश केला.

ही घटना समजताच शिवारातील लोकांनी तिला ताबडतोब केम येथील आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी दाखल केले. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांनी हिला तपासले असता तिला करमाळा येथे काँटेजला ताबडतोब दाखल करा असे सांगितले. पेंशटला करमाळा येथे काँटेजला नेल्यावर तिचा वाटेतच मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषीत केले.

तिची परिस्थिती अंत्यत गरीबीची आहे. तिला राहयला साधे घर नाही. हातावरील पोट आहे. ती गावात धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करत होती. तिचे पती वीटभट्टीवर कामगार आहेत.

तिच्या पश्चात पती, सासु,सासरे, दोन दिर आहेत.
या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे त्या कुटुंबाला ऊभे करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी. अशी मागणी समाजसेवक अनिल तळेकर ,आशा वर्कर सुशीला जाधव यांनी केली.

तसेच केम हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव तालुक्यापासून अत्यंत टोकावर आहे. केम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्पदंशावर उपचार केम मध्येच झाले पाहिजेत. त्यामुळे सर्पदंशावर उपचार करण्यासाठी ज्या उपकरणांची व औषधांची गरज आहे ते केम येथे उपलब्ध करून द्यावेत.

हेही वाचा- महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून वर्षांपासून फरार असणाऱ्या माजी उपसभापतीला करमाळा पोलिसांनी केली अटक

लस होत्या २०, आम्हाला मिळाले टोकन क्र. १९/२० ; ३ तास बसवून ठेवले आणि लस संपली म्हणून सांगितले; वीटच्या ‘फ्रंट लाईन वर्कर’ची तक्रार; चौकशी अन कारवाई होईल का.?

अशी मागणी केम येथील समाज सेवक अनिल तळेकर,व आशा वर्कर सुशीला जाधव यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व तहसीलदार समीर माने यांचेकडे ई मेल द्वारे केली आहे.

litsbros

Comment here