करमाळाकेमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

पंचायत समिती करमाळा आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंचायत समिती करमाळा आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ; करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कविटगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी दिनांक 01 सप्टेंबर 2022 ते 02 सप्टेंबर 2022 रोजी भरवण्यात आले त्यामध्ये श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम या शाळेने सहभाग नोंदविला सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्तरेश्वर हायस्कूल केम या विद्यालयाचा सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यी ओंकार त्रिंबक भिल्ल याने बोरवेल मशीन हे उपकरण सादर केले त्यास विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले.

श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापन समिती, केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here