करमाळाकेममाणुसकीसोलापूर जिल्हा

या कडक उन्हाळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका; वाड्यावस्तीवर चालत जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी लवकर सोडा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

या कडक उन्हाळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका; वाड्यावस्तीवर चालत जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी लवकर सोडा

केम(संजय जाधव) ; करमाळा तालुक्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. सुर्य आग ओकत आहे. तपमाण वाढले आहे. वाडया वस्तीवरिल शाळा लवकर सोडाव्यात असी मागणी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षाताई चव्हाण मॅडम यानी केली आहे.

कोरोनामुळे गेले दोन वर्षे झाले शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे हि वस्तुस्थिती आहे पंरूतु मुलाना वेठिस धरू नका, या साठी शासनाने पूर्ण वेळ शाळा क्षमतेने भरविण्याचे जाहिर केले.

त्यानुसार शाळेची वेळ सकाळी ७,३० ते दुपारी १२,३० ठेवली आहे मात्र ग्रामीण भागात सकाळि दहा वाजल्यापासून कडक ऊन पडतय शाळा सुटण्याची वेळ दुपारी १२,३० असल्याने पहिली ते चौथी ची चिमुकली विदयार्थाना ऊन्हाचा खूप त्रास सहन करावा लागतो.

कित्येक विद्यार्थी हे वाडया वस्तीवरिल पायी अनवाणी शाळा सुटल्यावर हे चिमुकले ऊन्हाच्या कारात ऊन्हाचे चटके खात डोक्याला प्रचंड ऊन लागते टोपी नाहि स्कारप नाहि अशात विदयार्थाना ऊष्माघाताचा त्रास होण्याची भिती पालकाला वाटु लागली आहे.

ज्या पालकांकडे गाडया आहेत ते पालक किंवा त्यांच्या घरची कोणीहि व्यक्ती आणायला जाती पंरूतु जे पालक मजुरी करतात अश्या मुलाना ऊन्हात चालत जाण्याशिवाय मार्ग नाही.

समाजसेवी संस्थानी या विद्यार्थांसाठी पायात चप्पल, डोक्याच्या टोप्या, मुलींना स्कार्प अश्या वस्तू द्याव्यात अशी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील समाजसेवा संस्थानी एक,एकग्रामीण भागातील शाळा दत्तक घ्यवा असी मागणी सुध्दा चव्हाण मॅडम यानी केली व प्रशासनाने या सर्व बाबीचा विचार करून सकाळि शाळा अकरा वाजता सोडाव्यात असी मागणी पालकातून होत आहे.

याबाबत करमाळा माढा न्यूजच्या प्रतिनिधी यांनी केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिली.

सध्या शाळा पूर्ण वेळ सुरू झालेल्या असून. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया गेलेली आहेत. त्यामुळे माननीय CEO व माननीय शिक्षणाधिकारी यांनी सकाळी सात ते साडेबारा या वेळामध्ये शाळा पूर्णवेळ घ्यायला सांगितल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. परंतु सध्या आपल्या भागामध्ये उष्णतेची लाट असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर जाताना उन्हाचा त्रास होत आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्याची योग्य ती काळजी घेऊन म्हणजे पायामध्ये चप्पल. पाण्याची बॉटल किंवा उन्हाच्या संरक्षणासाठी टोपी घेऊन द्यावी. व पाल्याला पूर्णवेळ शाळेमध्ये थांबायला सांगावे.

– महेश कांबळे (केंद्रप्रमुख केम)

litsbros

Comment here