अखेर केमकरांच्या संघर्षाला न्याय मिळाला; लाखोंची तिकिटे, आंदोलने, पाठपुरावा यानंतर महत्त्वाच्या ‘या’ दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना केम स्थानकावर थांबा मिळाला
माननीय खासदार श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा
केम : ( प्रतिनिधी-संजय जाधव ) खूप दिवसांची केमकरांची प्रलंबित असलेली मागणी अखेर खासदारांच्या अथक प्रयत्नाने रेल्वे मंत्रालयाने मान्य केली मुंबई- पंढरपूर -मुंबई एक्सप्रेस आणि मुंबई- हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस या दोन गाड्यांना माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केमला थांबा मिळवून दिला प्रयत्न करत असताना खासदार यांनी रेल्वे सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला होता.
यासाठी रेल्वे प्रवासी संघटना केम यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा करून बऱ्याचं वेळा पत्र व्यवहार केला त्याचबरोबर गावातील व्यापारी वर्गानेदेखील यासाठी खूप मेहनत घेतली.
खासदारांच्या जनता दरबारामध्ये केम मधील नागरिकांनी रेल्वे थांब्याचा विषय लावून धरला होता त्यामुळे त्याचे श्रेय देखील एका अर्थाने केमकरांना सुद्धा जाते आणि केमला थांबा मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केम येथे दोन गाड्यानां थांबा मिळवून दिल्याबद्दल माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व माननीय गणेश चिवटे यांचे केम येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष माननीय विजयसिंह ओहोळ यांनी आभार मानले आहेत.
Comment here