करमाळाकेमसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील केम जवळ रेल्वे रुळावरून घसरली; इंजिन थेट शेतात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील केम जवळ रेल्वे रुळावरून घसरली; इंजिन थेट शेतात

करमाळा : केम (ता. करमाळा) येथील एका लुपलाईन ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरले, त्यामुळे काहीवेळ रेल्वेलाईन बंद होती. रेल्वे अचानक घसरल्याने रेल्वेचे दोन्ही इंजिन थेट केम येथील शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात गेले.

सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून रेल्वेरुळाचे मात्र नुकसान झाले. सोलापूर- पुणे हा दुहेरी रेल्वे ट्रॅक असून या ट्रॅक वरील एका ट्रॅकवरुन जाणारी रेल्वे काल (ता. ३) रात्री केम जवळ घसरली व खाली गेली.

परंतु रेल्वे विभागाने आज पहाटे ३ वाजता तातडीने यंत्रणा सज्ज करून क्रेनद्वारे हे रेल्वेचे दोन्ही इंजिन पुन्हा रेल्वे ट्रॅकवर लावून पूर्ववत करण्याचे काम चालू आहे.

यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात.परंतु काही वेळ एक रेल्वे ट्रॅक बद होता त्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता घटनास्थळी रेल्वे पोलीस बंदोबस्त ठेवला.

हि घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती हि गाडि लुपलाईनवर असल्याने रेल्वे लाईन सुरळित पणे सुरू आहे.

litsbros

Comment here