करमाळाकेमसोलापूर जिल्हा

केम येथे प्रहार संघटनेच्या वतीने ई-श्रमदान कार्ड व अपंग मेळावा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे प्रहार संघटनेच्या वतीने ई-श्रमदान कार्ड व अपंग मेळावा संपन्न

केम(संजय जाधव) ; रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने व मनोज राऊत(गटविकास अधिकारी करमाळा),  दत्ताभाऊ मस्के पाटील प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष सोलापूर, अजित भाऊ कुलकर्णी प्रहार संघटना सोलापूर शहराध्यक्ष, रमेश पाटील, (संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शन मध्ये आयोजित करमाळा तालुक्यातील केम मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यात सर्व संघटित व असंघटित कामगारांसाठी श्रम कार्ड व समाज कल्याण विभाग जिल्हा सोलापूर यांच्या विविध योजनेसाठी दिव्यांग, बंधू- भगिनींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हेही वाचा- करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस पेटवून देण्याची वेळ; शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा, मतं मागायला बांधावर येणारे नेते, आता फोन ही उचलणार नाहीत!

ऊसतोडणी अभावी शेतकरी आला मेटाकुटीला; ऊसतोड यंत्रणेकडून राजरोसपणे होत आहे शेतकर्‍यांची लूट ; शेतकऱ्यांना कोण वालीच उरला नाही!

प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा यांच्या वतीने आज दिनांक 20/2/2022 रोजी वार रविवार श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम या ठिकाणी कामगार दिव्यांग बंधू भगिनी यांची श्रमकार्ड नोंदणी व समाज कल्याण विभाग सोलापूर यांची दिव्यांग बांधवांसाठी असलेली योजनेचे आयोजन केले होते.

सदरील कार्यक्रमाला केम गावातील व करमाळा तालुक्यातील शेजारील गावांमधील नागरिकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद होता. 25 दिव्यांग बांधवांनी व 50 संघटित ,असंघटित कामगारांची ई श्रम नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर युवा उद्योजक सागरराजे दौंड, पिंटूशेठ रायचूरे, गणेश आबा तळेकर, प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर,महिला तालुकाध्यक्ष स्वाती गोरे,सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष युनूस पठाण, करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार करमाळा तालुका सचिव प्रवीण मखरे,

करमाळा तालुका संघटक नामदेव पालवे,तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, करमाळा , मलवडी शहराध्यक्ष जनार्दन मंगवडे मलवडी शहर संपर्क प्रमुख प्रवीण मत्रे व मलवडी शाखा अध्यक्ष सोमनाथ जाधव उपस्थित होते.

litsbros

Comment here