करमाळाकेम

केम येथे सोमवारी होणार सुकन्या समृद्धी महामेळावा; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे सोमवारी होणार सुकन्या समृद्धी महामेळावा; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

उपळवटे (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील केम येथे सोमवार दिनांक 06-12-2021 रोजी केम पोस्ट ऑफिस येथे( विशेष सुकन्या समृद्धी महामेळावा ) आयोजित करण्यात आलेला आहे.
ज्या व्यक्तींनी आपल्या दहा वर्षाच्या आतील मुलींचे सुकन्या खाती उघडलेली नाहीत, त्यांनी संपर्क करावा.

नागरिकांनी आपल्या मुलीचे अकाउंट उघडून मुलीचे भविष्य उज्वल व सुरक्षित करावे. तसेच केम येथील हा मेळावा सफल करण्यास सहकार्य करावे. वाढत्या महागाईच्या काळात आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता दूर करण्यासाठी समृद्धी सुकन्या योजनेची खाती केम येथील सर्व नागरिकांनी उघडून घेणे गरजेचे आहे.

या मेळाव्यासाठी करमाळा पोस्ट ऑफिस येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यासाठी केम येथील नागरिकांनी लागणाऱ्या खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.


कागदपत्रे
1) मुलीचा जन्माचा दाखला किंवा मुलीचे आधार कार्ड झेरॉक्स
2) मुलीचे आई किंवा वडील यांचे आधार कार्ड झेरॉक्स व तीन फोटो आवश्यक आहेत.

संपर्क- पोस्ट मास्तर -9765467557 पोस्टमन-860598589
9552384817

litsbros

Comment here