करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
केम येथील श्री उत्तरेश्वर महाराज मंदिराच्या कामासाठी ‘या’ भक्ताने दिली ५१ हजारांची देणगी
केम(संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरी पुनर्भरणाचे कामासाठी ऊत्तरेश्वर भाविक अपंग बांधव दत्तात्रय यशवंत कुलकर्णी या भाविकाने ५१००० रू देणगीचा धनादेश श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य अरूण वासकर, मोहन दौड यांच्याकडे सुपूर्द केला.
या वेळी देवस्थान ट्रस्टचे वतीने त्यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी सदस्य मनोज,सोलापूरे, विजय तळेकर, तसेच देवस्थान चे पुजारी बाळू गुरव उपस्थित होते.
Comment here