केम येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
केम(संजय जाधव) ; केम तालुका करमाळा येथे शिवसेना शाखेच्या वतीने हिंदू हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त हिंदू हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन युवासेनेचे सागर राजे तळेकर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री हरी भैय्या तळेकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. या नंतर कामगार काॅलनी मधील बिहारी कामगारांना व त्यांच्या मुलाना खाऊ वाटप करण्यात आला.
या वेळि अच्युत काका पाटील, शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख ऊत्तरेश्वर,तळेकर,आवीनाश तळेकर, महावीर तळेकर, महादेव पळसकर, नवनाथ खानट, ऊत्तरेश्वर टोंपे, सोमा रंदवे, शिवा मोरे, धनंजय ताकमोगे,
वसंत तळेकर हनुमंत रंदवे गुरूजी नवनाथ देवकर, ऊत्तरेश्वर गोडगे रमेश कांतीलाल तळेकर गोविंद तळेकर, समाधान गुरव महेश तळेकर सर आदि उपस्थित होते.
Comment here