करमाळा तालुक्यातील केम येथे ढगफुटी सदृश्य पाऊस: प्रचंड नुकसान, भरपाईची मागणी
केम (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील केम परिसरात रात्री ढगफुटी सारखी अतिवृष्टीमुळे शेतकरी, दुकानदार टपरीधारक यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.
त्यात सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,माजी सरपंच अजित तळेकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, संपर्क प्रमुख सागर पवार भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे यानी मा, तहसिलदार जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
गुरूवारी रात्री दोन वा,पावसाला सुरूवात हा पाऊस इतका जोरदार होता सगळिकडे पाणीच पाणी झाले रेल्वे पुलाखाली मोठया प्रमाणावर पाणी आल्याने करमाळा, कुर्डुवाडी ला जाणारे रस्ते बंद झाले ओढयातील पुलावर तीन ते चार पुट पाणी वाहत होते.
त्यामुळे वाहतूक खोळंबली होती या पुलाच्या शेजारील आशीर्वाद अॅग्रो सव्हींसेस या दुकानात दोन फूट पाणी होतै या पाण्यात औषध पाकिट रसायनिक खते, या मध्ये पाणी शिरून सुमारे तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाले आहे.
तसेच या रोडच्या कडेला असलेल्या टपऱ्या मधील पाच ते सहाजणाच मिळून एक लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे तसेच महादेव पाटमास यांच्या वर्कशॉप मधील मशिनरी वाहून गेल्या आहेत त्यांचे दोन लाखा पर्यंत नुकसान झाले आहे.
ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिराच्या पायरीला पाणी लागले वीस वर्षे झाला असा पाऊस केमला झाला होता त्यानंतर आता झाला आहे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळी गदीं केली होती हा पाऊस सायंकाळी झाल्यामुळे जिवीत हानी झाली नाहि हा दिवसा पाऊस पडला असता तर काहि जणानी पाण्यात गाडया घालण्याचे धाडस केले असते.
आज दुपारी तहसिल दार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत कृषी अधिकारी वाकडे, साहेब तलाटि प्रमोद चव्हाण आदि नी पाहणी केली.
पंरूतु शेताच्या बांधावर अधिकाऱ्याना पाणी असल्यामुळे जाता आले नाही दोन दिवसात शेतकऱ्यांचे पिकाचे पंच नामे करण्यात यैतील असे तहसिलदार यानी सांगितले.
Comment here