करमाळाकेम

केम येथील श्री.नागनाथ गतिमंद विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा; दिव्यांगांच्या ‘या’ स्पर्धा उत्साह संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील श्री.नागनाथ गतिमंद विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा; दिव्यांगांच्या ‘या’ स्पर्धा उत्साह संपन्न

केम(संजय जाधव) ; श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संचलित श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम ता करमाळा
या शाळेत 3 डिसेंबर 2021 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
दिव्यांग मुलांच्या क्रीडा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण ए एम यांनी केले. दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष श्री भानुदास काळे होते दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्पॉट जप बादलीत बॉल टाकणे संगीत खुर्ची निंबू चमचा रिंग मधून बॉल टाकणे तसेच रंगभरण या स्पर्धाचे आयोजन केले होते.

 

विजयी स्पर्धक व सहभागी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दिव्यांग मुलाविषयीं व शासनाच्या योजना बाबत विशेष शिक्षिका श्रीमती जाधव व्ही बी यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम या शाळेकडून दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले या कार्यक्रमास सर्व कर्मचारी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे एच एस यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

litsbros

Comment here