करमाळाकेमक्राइमसोलापूर जिल्हा

बापच झाला लेकीचा वैरी; जन्मदात्या बापाने केला मुलीवर बलात्कार; नात्याला काळिमा फासणारी करमाळा तालुक्यातील घटना, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बापच झाला लेकीचा वैरी; जन्मदात्या बापाने केला मुलीवर बलात्कार; नात्याला काळिमा फासणारी करमाळा तालुक्यातील घटना


केम(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील केम या गावात मानवता व नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. समाजातील सुज्ञ नागरिकांची मान शरमेने खाली जावी अशी ही घटना आहे. वडील व मुलगी हे पवित्र नातं आहे, पण आजच्या समाजातील सगळ्या घडामोडी पाहता मुलगी वडिलांपासून ही सुरक्षित नाही, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणातील परिवार बाहेरगावचा असून ते सध्या केम येथे वीटभट्टीवर कामासाठी आलेले आहेत. त्या परिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या प्रकरणातील सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. त्या नराधम बापा विरोधात करमाळा पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार केवळ आजचा नसून गेल्या महिन्यात घडला असून त्यानंतर त्या बापाने मुलीसोबत वारंवार हा प्रकार केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर करीत आहेत.

litsbros

Comment here