करमाळाकेम

केम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती दीपोत्सव; अनोखी मानवंदना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती दीपोत्सव; अनोखी मानवंदना

केम( संजय जाधव) ; दीपावलीच्या निमित्त भव्य दिपोत्सव मोठ्या उत्साहात झाला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (शिवशंभो प्रवेशद्वार) परिसर दणाणून निघाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दीप उत्सवास प्रारंभ करण्यात आला. शिवशंभो प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच चौथरा पणत्यांनी उजळला होता. यावेळी अत्यंत प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा- करमाळा एसटी आगाराचा अजब कारभार; ‘प्रवासी कमी आहेत’ म्हणत रद्द केली मुक्कामी एसटी, प्रवासी महिला व नागरिकांचे हाल; प्रवाशांना उलट उत्तरे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ नवे आदेश; कडक कारवाईच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

फटाक्यांची आतिषबाजी तसेच शेकडो पणत्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकाशमय झाला होता.

या दिपोत्सवाचे आयोजन समस्त शिवशंभूभक्त यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव साहेब, संदिप तळेकर, अध्यक्ष सागरराजे तळेकर,

सचिन जाधव, समीर तळेकर, विक्रम तळेकर, दिपक भिताडे, राकेश दोंड, गणेश तळेकर, अक्षय तळेकर, अभयसिंह तळेकर, यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते

litsbros

Comment here