करमाळाकेमधार्मिकसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

केम येथील तरुणांनी जपली शंभर वर्षांपासूनची रामफेरीची परंपरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील तरुणांनी जपली शंभर वर्षांपासूनची रामफेरीची परंपरा

केम( संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम येथील तरूणानी शंभर वर्षाची राम फेरीची पंरपरा कायम राखली आहे. करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या केम येथे राम फेरीची पंरपरा सुरू आहे.

हि रामफेरीची सुरूवात अश्र्विन शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत हि राम फेरी सुरू असते त्रिपुरारी पौर्णिमेला या राम फेरीची सांगता होते या राम फेरीत पन्नास भाविक तरूण सहभागी होते.

हि राम फेरी विठ्ठल मंदिरातून सुरू होऊन ती मदनेश्वर,केमेश्वर बसमेश्वर राममंदिर , मागैं श्री ऊत्तरेश्वर मंदिरात पोहचते तेथील आरती घेऊन विठ्ठल मंदिरात येते असा महिनाभर हि रामफेरी सुरू असते.

राम फेरी मार्गावर महिला पहाटे ऊठून सडा रांगोळि घालतात व राम फेरी घराजवळ आल्यानंतर महिला ओवाळतात असा नितीनेम कार्यक्रम असतो या राम फेरीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला झाली या राम फेरीत सहभाग झालेल्या भाविक तरूणाना ग्रामस्थांचे वतीने फेटे बांधून सत्कार करण्यात आले.

या वेळि मंदिरात मोठया संख्येने भाविक उपस्थित होते केम सारखया मोठया गावातील तरूण वर्ग हि पंरपरा कायम राखली या बद्दल ग्रामस्थांनी यांचे कौतुक केले आहे.

litsbros

Comment here