करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथील कवी प्रकाश लावंड यांच्या कवितासंग्रहाला ‘मेघदूत’ पुरस्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील कवी प्रकाश लावंड यांच्या कवितासंग्रहाला ‘मेघदूत’ पुरस्कार

करमाळा(प्रतिनिधी) ; बार्शी येथील कवी कालिदास मंडळानं करमाळा येथील प्रख्यात कवी प्रकाश लावंड यांना ‘काडवान’ या कविता संग्रहासाठी, ‘मेघदूत’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या शानदार सोहळ्यात प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉ. राजेंद दास आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या शुभ हस्ते प्रकाश लावंड यांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी कवितेवर भाष्य करताना प्रमुख अतिथी डाॅ.राजेंद्र दास बोलले,जो कविता जगतो,तोच चांगली कविता लिहू शकतो.

ज्यानं माणूसपणं जपलं आहे,इतरांच्या माणूसपणाला समजून घेतलं आहे,तोच चांगली कविता लिहू शकतो.आपल्या भाषणात त्यांनी केशवसुत,बालकवींसह इतर कवींचा आदरानं उल्लेख केला.

परिक्षक प्रा.प्रमिलाताई देशमुख यांनी काडवान कविता संग्रहातील कवितांची सौंदर्य स्थळं उलगडून दाखवताना या संग्रहातील कवितांचा सविस्तर धांडोळा घेतला. या संग्रहातील माझा विठ्ठल फाटका,निधडा,मार्ग,फुटकी काकणं, वाडा,आटपाट शिवार होतं या कवितांवर भरभरून बोलल्या.प्रकाश लावंड यांनी आपल्या मनोगतातून आपल्या काव्य प्रेरणांचा व काव्य वाटचालीचा पट उलगडून दाखवला.

हेही वाचा – प्रवाशांसाठी खुशखबर; अडीच वर्षानंतर आता ‘या’ तारखेपासून धावणार ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ ;

पारेवाडी भुयारी मार्ग पाण्याखाली, पर्यायी रस्ता ही चिखलात; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे प्रचंड हाल; खासदार, आमदार, पुढारी व प्रशासन विचार करेल का.?

या कार्यक्रमाला कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, प्रकाश गव्हाणे, प्रा. प्रमिला देशमुख,दत्ता गोसावी, शब्बीर मुलाणी, कवी खलील शेख, कवी ओडिसियस,गझलकार नवनाथ खरात, किरण गायकवाड, प्राचार्य नागेश माने, रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी गणेश चिंचोले आणि श्री लावंड यांच्या कुटुंबियांसह मोठ्या प्रमाणात काव्य रसिक हजर होते.

litsbros

Comment here