करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; कात्रज येथे वीज पडून बांधलेल्या गाईचा मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; कात्रज येथे वीज पडून बांधलेल्या गाईचा मृत्यू

केत्तूर (अभय माने);करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी कात्रज येथील महेश तानाजी लकडे यांच्या वस्तीसमोर समोरील झाडावर वीज पडल्याने झाडाखाली बांधलेल्या एका जर्सी गाईचा मृत्यू झाला.

बुधवार ( ता. 2 ) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली यांनी आपल्या पाच गाई गोट्यासमोरील झाडाशेजारी बांधल्या होत्या या ठिकाणी वीज पडून जरशी गाय ठार झाली सदर गाय ही आठ महिन्याची गाभण होती.

लकडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे मृत झालेल्या जरशी गाईची किंमत 80 हजार रुपये आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून भरपाई देण्याची कारवाई करावी अशी मागणी लकडे यांनी केली आहे.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर केत्तूर, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, गवळवाडी, टाकळी, राजुरी, वाशिंबे, सोगाव परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

litsbros

Comment here