श्री कमलाभवानी मंदिरात गुरुवारी होणार विधिवत घटस्थापना; ‘यांची’ असणार उपस्थिती
करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात गुरुवारी ७ आक्टोबर रोजी सकाळी ८.४५ वाजता विश्वस्त सुशील राजन राठोड व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे.
यावेळी श्री कमलाभवानी मातेची अलंकार भूषीत महापुजा संपन्न होणार आहे, मंदिर समिती कडून कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे यासाठी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य विश्वस्त सोमनाथ चिवटे यांनी केले आहे.
या महापुजेसाठी तहसीलदार तथा पदसिद्ध विश्वस्त समीर माने, विश्वस्त मंडळ सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉ प्रदिपकुमार पाटील डॉ. महेंद्र नगरे, यांचेसह बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी, संदिप पुजारी, विजय पुजारी मधूकर सोरटे, नारायण सोरटे दिपक सोरटे, रणजित सोरटे, अभिमान सोरटे, तुकाराम सोरटे, महेश कवादे, पुरोहित रविराज पुराणिक,
रंगनाथ पुराणिक, मानकरी शिवशंकर फुलारी, बबन दिवटे, राजेंद्र शिंदे, प्रमोद गायकवाड, शिवाजी पकाले, इंताज शेख, मनोज जामदार,शिलाबाई गोमे, रमेश माळी, ईश्वर पवार, पद्माकर सुर्यपुजारी, दिनेश पवार,
सिध्देश्वर सोरटे, राजाभाऊ फलफले, व्यवस्थापक अशोक घाटे, महादेव भोसले, लक्ष्मण हवालदार इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
Comment here