करमाळाधार्मिक

तीन वर्षानंतर यंदा आई कमलाभवानीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहामय वातावरणात साजरा होणार; वाचा कसे आहे यंदाच्या उत्सवाचे नियोजन.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तीन वर्षानंतर यंदा आई कमलाभवानीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहामय वातावरणात साजरा होणार; वाचा कसे आहे यंदाच्या उत्सवाचे नियोजन.?

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील आराध्य दैवत असलेल्या आई कमला भवानी मातेचा नवरात्र उत्सव 3 वर्षाच्या कालावधी नंतर कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या रोगाच्या महामारीनंतर बचावलेल्या भक्तगणांना व भक्तांना
यंदाचा नवरात्री उत्सव चांगल्या भक्ती भावाने पाहण्यास मिळणार करमाळा तालुक्यातील आराध्य दैवत असलेले श्री देवीचा माळ येथील तीन शक्तीपीठापैकी एक शक्ती पीठ उभा राहिलेला आहे.

९६ कुळीचा उद्धार करणाऱ्या करमाळा तालुक्यातील आई कमला भवानी मातेचा नवरात्र उत्सवाचा गजर तमाम करमाळा तालुका व महाराष्ट्रातील भाविक भक्तांना नवरात्राचा उत्सव साजरा होणार.

या उत्सवाचे नियोजन श्रीदेवीचा मळा ग्रामपंचायत कमला भवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येतो हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो.

आई कमला भवानी करमाळा व महाराष्ट्रातील भाविक भक्तांना नवसाला पावणारी म्हणून ओळखले जाते प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावागावातून वाडी वस्तीवरून भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी उपस्थित होती या उत्सवाला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात.

नवरात्रीच्या काळात करमाळा शहर तालुक्यातील भाविक भक्त करमाळा शहरातील मुस्लिम बांधव
मांसाहारी ची दुकाने पूर्ण नऊ दिवस बंद ठेवून सहकार्य करतात.

नऊ दिवस नवरात्रीचे उपवास असतात
त्यानिमित्ताने श्रीदेवीचा माळ येथील
जगदंबा देवी अन्नछत्र मंडळ श्रीदेवीचा माळ यांच्यावतीने भाविकांना मोफत उपवासाचे पदार्थ वाटप करतात.

श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत च्या वतीने
सर्व उपाययोजना करण्यात आले आहे
नवरात्री काळात लाईट पाणी दिवाबत्ती प्रश्न ग्रामपंचायत च्या वतीने योग्य नियोजन करण्यात येणार आहे.

या उत्सवाला पर राज्यातून पर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून व्यवसायिक व विक्रेते यांचे आगमन झाले आहे मोठ्या उत्साहाने
हा नवरात्र उत्सव भरणार असून
या उत्सवासाठी खेळणी वाले पाळणे वाले स्टेशनरी सौंदर्यप्रसाधनाचे दुकाने
थाटणार आहेत खाद्यपदार्थ खाद्यपदार्थांचे विक्री स्टॉल उभारणार आहेत.

हा उत्सव करमाळा शहर तालुक्यातील लोक मोठ्या भक्ती भावाने व आनंदाने साजरा करतात मंदिरावर वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रकारचे उंच पाळणेयाचे नियोजन ९६ पायऱ्यांच्या विहिरीजवळ केले आहे.

त्यांची देखील लाईट दिवाबत्तीची सोय केली आहे सर्व धंदे व्यवसायिकांना सर्व प्रकारचे सहकार्य ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणार आहे.

श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच महेश सोरटे उपसरपंच दीपक थोरबोले ग्रा’ प सदस्य अमोल चव्हाण संतोष पवार सचिन शिंदे व
श्रीदेवीचामाळ तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन शेठ चोरमले सर्व ग्रामपंचायत स्टाफ कर्मचारी वर्ग व

श्रीदेवीचा माळ येथील देवस्थानची पुजारी
ट्रस्ट व्यवस्थापन समिती कमला भवानी मंदिरातील मानाचे मानकरी दादासाहेब पुजारी, बाळासाहेब सोरटेकमलाकर सोरटे पंडित सोरटे,
मंदिरातील विश्वस्त व मानकरी इंताज रोशन शेख, बबन दिवटे, विलास दबडे, ईश्वर पवार, राजेंद्र सूर्यपुजारी, पद्माकर सूर्य पुजारी सनी पुराणिक श्रीकांत गोमे राजेंद्र शिंदे मोहन शिंदे

हनुमंत पवार बापूसाहेब पुजारी गोंधळी समाजाचे प्रमोद गायकवाड सतीश थोरबोले दीपक थोरबोले अशोक थोरबोले व सर्व मानकरी आपली सेवा अर्पण करतात फुलारी परिवाराकडून नवरात्र उत्सव काळात फुलांचे हार व फुले माळ घालण्यासाठी उपलब्ध करतात.

विजय पुजारी वाहनकरी बापू चांदगुडे प्रभाकर धोंडे दिलीप चव्हाण विजय चव्हाण अर्जुन चव्हाण सतीश अनभुले नागेश अनभुले श्रीराम फलपले अभिमान पवार योगेश सोरटे अक्षय सोरटे ओंकार पुजारी, महेश कवादे, पै प्रशांत पवार, नाना बिडवे शिवशंकर बिडवे, राजेंद्र बिडवे दसऱ्याच्या दिवशी खंडोबा देवस्थान च्या पालखीची सेवा शेखर पवार व सतीश अनभुले सर्व खांदेकरी व मानकरी नवरात्र काळात आपली सेवा बजावतात.

श्रीदेवीचा माळ नवरात्री उत्सव काळात करमाळा शहरातील पत्रकार पत्रकार बंधू सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया यांच्यावतीने नवरात्र उत्सव सादर केला जातो.

करमाळा शहर व तालुक्यातील तमाम भाविक भक्तांना कळविण्यात येते की नवरात्र उत्सवात सहभागी होऊन आई कमला भवानीच्या नवरात्र उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतचे सरपंच महेश सोरटे उपसरपंच दीपक थोरबोले यांनी केले.

litsbros

Comment here