जिंती केंद्राचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच गटविकास मनोज राऊत यांच्या प्रेरणेतून जिंती केंद्राचे केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. करमाळा तालुक्याचे पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज राउत साहेब व गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली येथे (ता.22) रोजी भरण्यात आले होतें.
गणित थोर गणितज्ञ रामानुजन यांची जयंती साजरी करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करमाळा पोलीस ठाण्याचे एपीआय कुंजीर साहेब कोंढार चिंचोलीचे नूतन सरपंच शरद भोसले आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र धांडे व केंद्रप्रमुख महावीर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक बारवकर मॅडम यांनी केले.केंद्रातील एकूण 19 शाळांनी सहभाग घेतला होता. 48 विद्यार्थ्यांनी 26 प्रयोग सादर केले.
यावेळी यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील कोंढार चिंचोली गावचे माजी सरपंच दिलीपकाका गलांडे मकाई कारखान्याचे संचालक नंदकुमार भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब गलांडे माजी उपसरपंच हनुमंत खांडेकर
ग्रामसेवक बोराडे भाऊसाहेब माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य , नूतन ग्रामपंचायत सदस्य पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शन आयोजन केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी केले होते.
Comment here