करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ‘पुणे-सोलापूर-पुणे’ पॅसेंजर ‘या’ तारखे पासून सुरू होणार; रेल्वे विभागाने दिली माहिती
करमाळा (प्रतिनिधी); सर्वसामान्यांची तसेच गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी सोलापूर पुणे पॅसेंजर ही येत्या 15 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी चालू होणार असल्याची अधिकृत माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी सदरची पॅसेंजर म्हणजे गरीब वर्गाला एक प्रकारची दिलासा देणारी रेल्वे गाडी आहे.
या पॅसेंजरने सर्वसामान्य गरीब वर्ग पुणे सोलापूर येथे प्रवास करतात गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी ही पॅसेंजर सेवा येत्या पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याने सर्वसामान्य प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Comment here