करमाळाजेऊरपुणेसोलापूर जिल्हा

सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी दिवसाच्या सत्रात तर पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी रात्रीच्या सत्रात पॅसेंजर गाडीच नाही; प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासन ढिम्म

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूरहून पुण्याला जाण्यासाठी दिवसाच्या सत्रात तर पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी रात्रीच्या सत्रात पॅसेंजर गाडीच नाही; प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासन ढिम्म

केतूर (अभय माने) ;  रेल्वे प्रशासनाने सोलापूर पुणे मार्गावरील पॅसेंजर डेमो रेल्वे सेवा 15 नोव्हेंबर पासून सुरु केली असली तरी या ठिकाणी वाहतूक चालू झाली असल्याने प्रवाशांना मात्र असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे.

मार्च 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेने होणारी प्रवासी रेल्वेगाड्या बंद केल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विशेष रेल्वे च्या नावाखाली प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आले.

परंतु यावेळी पॅसेंजर गाड्या मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन 15 नोव्हेंबरपासून पुणे सोलापूर मार्गावरील अनारक्षित पॅसेंजर (डेमो) प्रवासी वाहतूक सुरू झाली सकाळी आठ वाजता पुण्याहून सोलापूर कडे जाणारी गाडी निघत आहे तर सोलापूर हुन पुण्याकडे जाण्यासाठी मात्र दिवसा गाडीच नाही.

तर पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी रात्रीची गाडी नाही सोलापूरहुन रात्री पुण्याला जाण्यासाठी गाडी आहे परंतु सोलापूरहुन पुण्याकडे जाण्यासाठी दिवसा गाडी नाही पूर्वीप्रमाणे पुण्याहून सोलापूरला जाणारी सकाळच्या सत्रातील व रात्रीच्या सत्रातील तर सोलापूर पुण्याकडे जाणारी सकाळच्या सत्रातील व रात्रीच्या सत्रातील दोन्ही गाड्या पूर्ववत नियमित सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

litsbros

Comment here