करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

ज्यांना स्वतःच्या गावच्या तलावात पाणी आणता आले नाही ते कसले पाणीदार आमदार ? कुणी केला नारायण पाटील यांच्यावर हा आरोप? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ज्यांना स्वतःच्या गावच्या तलावात पाणी आणता आले नाही ते कसले पाणीदार आमदार ? कुणी केला नारायण पाटील यांच्यावर हा आरोप? वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी) ; दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 342 .30 कोटी निधी सुप्रमाद्वारे मंजूर केल्याची व दहीगावच्या वाटचालीत एक रुपया निधीही माजी आ. पाटील यांनी मंजूर केलेला नसल्याची माहिती आ.शिंदे यांनी प्रसिद्धीस दिली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी आ. नारायण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण दहीगावसाठी 90 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार त्यांचेच बंधू विलासदादा पाटील यांनी घेतला आहे.

याबाबत ते म्हणतात की, ज्या आमदारांना स्वतःच्या पाच वर्षाच्या कालावधीत दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या लव्हे गावातील एकमेव विठोबा तलाव पूर्ण क्षमतेने भरता आला नाही, ते स्वतःला पाणीदार आमदार समजतात ते कसले पाणीदार आमदार ?

दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू केल्यानंतर तत्कालीन आ.नारायण पाटील यांनी त्या योजनेचे एक आवर्तन दिले. परंतु पाणीपट्टी म्हणून प्रत्येक गावातील लोकांकडून वर्गणी गोळा केली.

गेल्या दोन वर्षापासून आ. संजयमामा शिंदे यांनी सातत्याने पाच आवर्तने दहिगाव उपसा सिंचन योजनेची दिलेली आहेत. त्याबदल्यात एक रुपयाही लोकवर्गणी त्यांनी गोळा केलेली नाही. उलट कृष्णा खोरे महामंडळाकडून या योजनेचे तब्बल अडीच कोटी रुपयांचे वीज बिल शासनाला भरण्यास भाग पाडले .

हेही वाचा- आ.संजय शिंदे यांनी खोटी विधाने करून जनतेत संभ्रम निर्माण करू नये, असे म्हणत नारायण पाटील यांनी केले ‘हे’ घणाघाती आरोप

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार जाहीर

माजी आ. पाटील यांच्या कारकीर्दीतील 71 लाख थकित वीज बिलही आ.संजयमामा शिंदे यांनी भरले असल्याचे सर्व लोकांना ज्ञात आहे.
माजी आ. पाटील यांच्या काळात राजकारणाचा भाग म्हणून नारळ फोडून नवीन चारी खोदली जायची ,पाण्याचे पूजन केले जायचे. त्यावेळी फक्त चारी ओली करण्यासाठी पाणी दिले जात होतो. आता आ. संजयमामा शिंदे यांच्या कारकिर्दीत पिकांसाठी पाणी दिले जात आहे.

त्याचे फलित म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बारमाही पिकांची क्षेत्र वाढलेले आहे. लोकांना दहीगाव योजनेबद्दल आत्ता विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे आपण दहीगाव योजनेसाठी खूप मोठे काम केले हा दावा माजी आ. पाटील यांनी करू नये. स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या चुका त्यांनी शोधाव्यात असा सल्ला माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांनी आमदार पाटील यांना दिलेला आहे.

litsbros

Comment here