करमाळाजेऊर

सगळं सुरू असताना पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा आडमुठेपणा, सणासुदीतही पॅसेंजर रेल्वेगाड्या नसल्याने प्रवाशांचे हाल !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सगळं सुरू असताना पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा आडमुठेपणा, सणासुदीतही पॅसेंजर रेल्वेगाड्या नसल्याने प्रवाशांचे हाल !

केतूर (अभय माने) कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व काही पूर्वपदावर सुरू होत असतानाही पॅसेंजर रेल्वे गाड्या बाबत रेल्वे प्रशासन ढिम्म का ? असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.

रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेच्या नावाखाली जवळ-जवळ सर्वच रेल्वे गाड्या तिकीट दर वाढवून सुरू केल्या आहेत परंतु, मध्य रेल्वेकडून सोलापूर – पुणे मार्गावरील पॅसेंजर गाड्या मात्र अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत,

सर्व व्यवहार तसेच प्रवास सुरळीत होत असतानाही गोरगरीब नागरीकांच्या प्रवासासाठी महत्त्वाची समजली जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद ठेवण्याचा आडमुठेपणा कशासाठी असा प्रश्नही रेल्वे प्रवाशांकडून विचारला जात आहे.

प्रत्येक वर्षी दिवाळी सणासाठी मध्य रेल्वे ज्यादा रेल्वे गाड्या सोडत असते कोरोना संख्या रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळी सण उत्साहात साजरा होत असताना पॅसेंजर रेल्वेगाड्या मात्र बंद असल्याने रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

हेही वाचा- करमाळा एसटी आगाराचा अजब कारभार; ‘प्रवासी कमी आहेत’ म्हणत रद्द केली मुक्कामी एसटी, प्रवासी महिला व नागरिकांचे हाल; प्रवाशांना उलट उत्तरे

शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत आवताडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच यांचा आ.शिंदे गटात ‘या’ दिवशी होणार प्रवेश व मेळावा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही लोकलही सुरू झाल्याचे समजते परंतु, सोलापूर मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरू का होत नाहीत.

सोलापूर विभागाने गाड्या सुरू करण्याबाबत वरिष्ठांची पत्रव्यवहार केला असल्याचे समजत असून रेल्वे विभाग मात्र याबाबत अद्यापही अंग झटकत आहे प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावरील पॅसेंजर गाड्या लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

जेऊर रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची मागणी-

करमाळा तालुक्याच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जेऊर रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबविण्याची मागणी होत आहे. पुणे मुंबई तसेच सोलापूरला फास्ट जाण्यासाठी या रेल्वे गाड्यांचा प्रवाशांना उपयोग होणार आहे.

litsbros

Comment here