निवडणुकीच्या तोंडावर जेऊरमध्ये मा.आ.नारायण आबा पाटील गटाला धक्का; दोन उपसरपंचांचा आ.शिंदे गटात प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर जेऊरमध्ये मा.आ.नारायण आबा पाटील गटाला धक्का; दोन उपसरपंचांचा आ.शिंदे गटात प्रवेश

करमाळा (प्रतिनिधी); रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी विद्यमान ग्रामपंचायत बॉडीतील पाटील गटाच्या दोन उपसरपंचांनी पाटील गटास रामराम ठोकून आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी अंगद गोडसे (मिस्त्री) व बलभीम जाधव यांच्या जाहीर प्रवेशावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले कि, जेऊर हे तालुक्यातील प्रमुख गाव असूनही विकासापासून कोसो दूर राहिले आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेऊर च्या विकासासाठी कटीबद्ध असून सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन आ शिंदे यांनी दिले आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलास(दादा) पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहास (बापू) निमगिरे, आप्पासाहेब मंजुळे, अभयराज लुंकड, अमर गादिया, नितीन खटके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, देवानंद पाटील, बाळासाहेब कर्चे, तुकाराम शिरस्कर, बालाजी गावडे, उमेश पाथ्रूडकर, निकील मोरे,

निलेश पाटील, सुयश करचे, विट्ठल लोंढे, किशोर कदम, धन्यकुमार गारुडी, महादेव कुंभार, आबा झाडे, सोमनाथ माने, अतुल निर्मळ, आदिनाथ माने, सुभाष जगताप, बाबू शिंदे, राकेश पाटील, अजित उपाध्ये, ज्ञानेश्वर निमगिरे, सागर माने, तुळशीदास निमगिरे, अरुण निर्मळ, सलीम शेख, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, महेश कांडेकर, जितेंद्र घोडके यांसह जेऊर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line