करमाळाजेऊरसोलापूर जिल्हा

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या घरी गौराई सोबत ज्ञानाई; देखाव्यातून प्रबोधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या घरी गौराई सोबत ज्ञानाई

करमाळा (प्रतिधिनी) ; जेऊर तालुका करमाळा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,राजमाता अहिल्याबाई होळकर, महिलांनाही माणूस म्हणून जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ती शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून व वैचारिक विचारांची पुस्तके मांडून जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां प्रियांका खटके यांच्या घरी गौरी सण साजरा करण्यात आला.

विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले , वित्तविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले, आधी विद्यादान मग कन्यादान ज्ञानामधील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते, असे शिक्षणाचे महत्व सांगणारा देखावा यावेळेस सादर करण्यात आला.

हेही वाचा- एकेकाळी बोंबील विकणारा मन्या कसा झाला मनोहरमामा? मन्याचा सदगुरू मनोहरमामा पर्यंतचा प्रवास!

करमाळा शहर व तालुक्यात डेंगू सदृश्य तापाने अनेक लोक आजारी

राजमाता जिजाऊ, दिल्ली झाली दीनवानी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी, अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई, फातिमा शेख,मुक्ता साळवे, रमाबाई या महानायिकेचे व बहुजन महापुरुषांचे विचार व स्त्रि शक्तीला आदर्थ माननारे विचार मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड या संघटनेमुळे कळाले म्हणून बहुजन महानायिकांच्या विचारांचे गौरीपूजन केले.

litsbros

Comment here