करमाळा

हिंदू मुस्लिम सलोखा जपणारे करमाळा येथील पत्रकार सय्यद भाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हिंदू मुस्लिम सलोखा जपणारे करमाळा येथील पत्रकार सय्यद भाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा प्रतिनिधी शहरातील जामा मशिदीचे विश्वस्त व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते कासम मोहम्मद सय्यद उर्फ सय्यदभाई पत्रकार (वय-६२) यांचे आज रविवार दि. २० रोजी दुपारी दोन वाजता ह्रदयविकाराने निधन झाले.

कासम सय्यद उर्फ सय्यद भाई पत्रकार हे शहरातील नामवंत पत्रकार होते. करमाळा शहरात हिंदू-मुस्लिम सलोखा ठेवण्यासाठी त्यांचा सतत पुढाकार होता. सय्यद भाई यांच्या संकल्पनेतूनच दरवर्षी शहरातील सर्व गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवर जामा मशिदीतून पुष्पवृष्टी केली जाते.

सय्यद भाई हे करमाळा एस.टी. स्टँड समोर जमजम रसवंतीगृह चे मालक होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वधर्मियात दु:ख व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर करमाळा येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होती.

litsbros

Comment here