करमाळाक्राइमपुणे

श्री.संत बाळूमामाचे नाव वापरणाऱ्या ‘या’ नव्या जमीर भोंदुबाबावर जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आता ‘या’ नव्या जमीर भोंदुबाबा जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (प्रतिनिधी:) ;  बिरगुडवाडी (कळस)ता.इंदापूर येथे संत बाळुमामाच्या नावाने बेकायदेशीर मठ सुरू करून अनेकांना गंडा घालणा-या जमीर दाऊत शेख उर्फ बाळुमामा याच्यावर जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोफळज तालुका करमाळा येथील भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की बिरगुडवाडी या ठिकाणी संत बाळुमामाचा अवतार म्हणून गोरगरीब ,कष्टकरी लोकांना भुत, भानामती, करणी त्यासाठी जादुटोणा करून अनिष्ट रूढी, पुजा अर्चा करून नागरीकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटत आहे.

अशा स्वयंघोषित संत भोंदुबाबा जमिर शेख उर्फ बाळुमामा याने श्री संत बाळुमामा अध्यात्मिक तळ या नावाने बेकायदेशीर मठाचे काम वर्ग 2 च्या जागेत सुरू केले आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

litsbros

Comment here