करमाळाशैक्षणिक

करमाळा तालुक्यातील हिसरे येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील हिसरे येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा (प्रतिनिधी) ;राजर्षी शाहूजी महाराज त्यांच्या 148 व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी हिसरे यांच्यावतीने प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहूजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दहावी आणि बारावी पास झालेल्या मोनिका लहू विटकर, सुजित सुधाकर पवार, यशराज सुनील ओहोळ, मुन्ना ताहीर शेख, यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून एडवोकेट महादेव कदम जिल्हा सचिव बसपा संजय शिंदे अध्यक्ष करमाळा विधानसभा बसपा अनिल जोगदंड तालुका सचिव बसपा युवाव्याख्याते सचिन कदम त्याचबरोबर हिसरे गावचे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला .

यावेळी एडवोकेट कदम म्हणाले की आज देशाला आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची गरज आहे आणि अशा जयंतीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे

शिंदे म्हणाले की,सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे

व्याख्याते सचिन कदम यांनी कोणतेही ध्येय आणि उद्दिष्टे आणि यश संपादन करण्यासाठी कष्ट करण्याची जिद्द चिकाटी या गोष्टी किती महत्त्वाचे आहेत हे यावेळी सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन समाज पार्टीचे युवा नेतृत्व मा. राजेश पवार यांनी केले.

हेही वाचा – मिरज येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचे आत्महत्या प्रकरण, सावकरकिसह गुप्तधन प्रकरणही: ‘त्या’ दोन मांत्रिकाना पकडण्यासाठी कर्नाटकसह सोलापुरात छापे- वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यातील राजुरी येथील उपक्रम राज्याला प्रेरणादायी; गटविकास अधिकारी मनोज राऊत

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास ननवरे, पै. बाळासाहेब पवार, संतोष ओहोळ, हनुमंत पवार,साबीर शेख,सोमनाथ लोंढे,भाऊ भोसले, दिलीप ओहोळ, दिपराज भोसले पृथ्वीराज भोसले, सोमनाथ ओहोळ, नागनाथ ओहोळ, भाऊ सातपुते, शहाजी रंदिल यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here