करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील पूर्व भागात हिसरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘हिसरे ते करमाळा’ गावांचा संपर्क तुटला; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील पूर्व भागात हिसरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘हिसरे ते करमाळा’ गावांचा संपर्क तुटला; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

जेऊर (प्रतिनिधी); करमाळा शहर व तालुक्यात आज पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली तालुक्यातील विशेषता पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला यामुळे हिसरे ते करमाळा या गावाचा संपर्क तुटला आहे.

आज पहाटेपासून अचानक झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांची दाणादाण उडाली यामध्ये शेतकरी वर्गा चे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये उडीद पिके काढून ठेवली होती मात्र अचानक पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

हिसरे ते करमाळा या गावाजवळील हिसरे नाल्याला भरपूर पाणी आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता मात्र हळूहळू पाण्याचा जोर कमी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही अंशी प्रमाणात चालू झाली आहे


नुकसान भरपाईची होत आहे मागणी

करमाळा तालुक्यात आज पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतातील उडीद पिके अक्षरशा पाण्यात गेली असून अनेक पिकांची शेणाचा सडा झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये मात्र नैराश्याचे वातावरण पसरले आहे तेव्हा नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे.

litsbros

Comment here