करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

तुमच्या घरात किती पैलवान आहेत? तुमच्यात किती दम आहे? अशी धमकी देत हिसरे येथे तिघांची एकाला जबर मारहाण ; आरोपी अजून मोकाटच

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तुमच्या घरात किती पैलवान आहेत? तुमच्यात किती दम आहे? अशी धमकी देत हिसरे येथे तिघांची एकाला जबर मारहाण ; आरोपी अजून मोकाटच

करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील हिसरे येथे पूर्वी झालेल्या वादावरून तिघांना दोन मुलांसह वडिलांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार सोमवारी (ता. 22) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडला आहे. यात एकजणाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा वरील बाजूचा दात तुटलेला असून उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचे नाव साबीर शेख आहे तर दुसऱ्या जखमीचे जुबेर शेख असे नाव आहे.

याप्रकरणी ईलाही मुजीर शेख (वय 35, रा. हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून वडील गुरूदास सगाजी जाधव यांच्यासह अशोक गुरूदास जाधव व दीपक गुरूदास जाधव (सर्व रा. हिसरे) या दोन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, सागर जाधव याच्या पडीक शेतजमीनीत म्हैस बांधण्यावरून गावातील अशोक गुरूदास जाधव व गुरूदास जाधव यांनी तु शैलेश जाधवच्या मुलास का शिवीगाळ केली म्हणून मारहाण केली होती.

हेही वाचा- खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?

सोलापूर जिल्ह्यातील ‘इतक्या’ नागरिकांचे लसीकरण पूर्ण : जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

तेव्हा अशोक जाधवचा चुलत भाऊ दत्तात्रय यांनी मला माझी आई वारली आहे. आईचा दहावा झालेनंतर तुमच्यातील वाद मिटवितो असे सांगितलेने त्यांच्याविरूध्द तक्रार दिली नव्हती.

सोमवारी सकाळी टेलरच्या दुकानात ड्रेस दुरूस्त करण्यासाठी गेलो तेव्हा मुलगा साबीरने अशोक गुरूदास जाधवला मी व जुबेरनी पाच दिवसापूर्वी तुम्हाला का मारहाण केली होती? असे विचारले असता त्याने शिवीगाळ केली. तुम्ही गावात चौकात या तुमच्या घरामध्ये किती पैलवान आहेत? तुमच्यात किती दम आहे ते बघतो, अशी धमकी दिली.

त्यावेळी मी, मुलगा साबीर व जुबेर चौकात अशोक जाधवला मुलांना शिवीगाळ करून धमकी का दिली विचारले. तेव्हा तो पळून गेला.

दरम्यान आम्ही घराकडे जात असताना गुरूदास सगाजी जाधव व त्याचा मुलगा दीपक गुरूदास जाधव एसटी स्टॅन्ड चौकात आले. आम्हाला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. अशोक जाधव याने लोखंडी रॉडने मुलगा साबीरच्या नाकावर मारहाण केली. तेव्हा साबीरच्या नाका- तोंडातून रक्त येऊ लागले.

भांडणे मिटल्यानंतर साबीर व जुबेरला टेम्पोमध्ये बसवून पोलिस ठाण्यात घेऊन आलो. त्यानंतर आम्हाला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी साबीरला उपचारासाठी सोलापूर येथे रेफर केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला पिता गुरुदास सगाजी जाधव त्यांची मुले अशोक गुरुदास जाधव दिपक गुरुदास जाधव यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम नुसार 326 324 323 504 506 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेतील आरोपी मात्र अद्यापही फरार –

सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे अद्यापही आरोपी बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे सदर घटनेतील आरोपींना त्वरित पकडण्यात यावे अशी मागणी इलाही शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

litsbros

Comment here