हिंगणी येथे काळभैरव जन्माष्टमी उत्साहात
केतूर (अभय माने) नागरिकांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असणाऱ्या काळभैरव जन्मोत्सव (जन्माष्टमी) सोहळा हिंगणी (ता.करमाळा) येथे शनिवार (ता.27) रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
येथील मंदिरात सकाळपासून कीर्तन,भजन सेवा सुरू होती रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा झाला यावेळी ” भैरवनाथाच्या नावानं चांगभलं sss ” जयघोष होत होता.
यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती त्या बरोबरच मंदिरात मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
गेल्या दोन वर्षापासून या परिस्थितीमुळे मंदिर परिसर सुनासुना होता मात्र पुरणाचे निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नागरिकांनी काळभैरवाचे दर्शन घेतली यावेळी मंदिर परिसर गुलालाने न्हाऊन गेला होता.महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
छायाचित्र: मंदिरात करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट
Comment here