रविवारी करमाळ्यात डायलिसिस सेंटर चे उद्घाटन; कार्यक्रमाला ‘हे’ दोन खासदार व चार आमदार राहणार उपस्थित
करमाळा जि सोलापूर येथे रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर उद्घाटन
खा. डॉ सुजयदादा विखे पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. गोपीचंद पडळकर , आ.सचिन कल्याणशेट्टी , आ. संजयमामा शिंदे राहणार उपस्थित
आमदार शहाजीबापू पाटील, श्री शिवाजीराव सावंत यांचीही राहणार प्रमुख उपस्थिती
करमाळा(प्रतिनिधी); खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर चे उद्घाटन 30 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी सहा वाजता करमाळा येथे होणार आहे.
करमाळा शहर आणि तालुक्यातील रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर ही अत्यावश्यक सेवा होती. ही सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते, मात्र आता या सुविधे मुळे करमाळ्यातच ही सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
यापूर्वीच श्री कमला भवानी ब्लड बँक ची करमाळा उभारणी करून रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार सुजयसिंह विखे पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार गोपीचंद पडळकर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत आमदार शहाजी बापू पाटील आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण पाटील जयंतराव जगताप रश्मी दीदी बागल सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित वायबसेयांनी दिली आहे
करमाळा येथील रुग्णांची सेवा करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अपेक्स किडनी सेंटर या अत्याधुनिक कंपनीच्या माध्यमातून ही सेवा करमाळ्यात उपलब्ध होणार आहे.
Comment here