करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

दिवंगत प्रमोद कांबळे यांच्या कुटुंबीयाना सरडे व मित्रपरिवाराची दिवाळीची आगळीवेगळी भेट 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिवंगत प्रमोद कांबळे यांच्या कुटुंबीयाना सरडे व मित्रपरिवाराची दिवाळीची आगळीवेगळी भेट

करमाळा (प्रतिनिधी) ;  दिवगंत प्रमोद कांबळे यांच्या कुटुंबियांना दिवाळीनिमित्त माजी उपसभापती दत्तात्रय ( काका) सरडे यांच्या पुढाकाराने आर्थिक मदत करण्यात आली.

प्रमोद कांबळे हे गरूडा या खासगी वाहतूक कंपनीत पुणे येथे ड्राइव्हर म्हणून सेवेत असतानाच कोरोनाची बाधा झाली.यावेळी सहकारी मित्रांनी दवाखान्यात शक्य ती सर्व मदत केली परंतु दैवाची साथ न लावल्यामुळे कोरोना मुळे त्यांचा बळी गेला.

त्यांच्या स्मृतींना उजाळा देत या दिवाळीत देखील सर्व गरूडा ग्रुपमधील त्यांच्या सहकारी मित्रांनी करमाळा तालुक्याचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या पुढाकाराने जवळपास पन्नास हजार रूपयांची मदत केली. यामध्ये पोफळज गावचे उपसरपंच जीवन पवार यांसह महादेव शिंदे,शिवाजी धुमाळ ,अजित कोंडे,राहुल महाडिक आणि भास्कर भिसले यांचा समावेश होता.

या मदतीबरोबरच भविष्यात देखील शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दत्तात्रय सरडे यांनी यावेळी दिले.

litsbros

Comment here