करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

करमाळा शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, ऊस भुईसपाट, शेती पिकांचे मोठे नुकसान 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, ऊस भुईसपाट, शेती पिकांचे मोठे नुकसान

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा शहरात आज मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली असून विजेचा कडकडाट सह पाऊस पडला मुसळधार पावसाने करमाळा शहरातील नाले ओढे तसेच गटारी तुडुंब भरल्या होत्या वादळी वारा तसेच मुसळधार पाऊस यामुळे वीज वितरण मंडळाने नेहमीच्या पद्धतीने विज गायब केली होती.

सध्यातरी करमाळा शहरात मुसळधार पाऊस बंद झाला असला तरी रिमझिम पावसाच्या सरी अद्यापही पडत आहे सदरच्या मुसळधार पावसामुळे शहरातील रंभा पुरा येथील ओढे-नाले तसेच अहमदनगर रोड येथील छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार पावसाचे संकेत दिले होते.

त्यानुसार आज करमाळा शहरात आज 15 ते 20 मिनिटे मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे सर्वसामान्यांचे फार हाल झाले.

हेही वाचा- ‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपलं; करमाळयाच्या बंडूचा हरियाणात मृत्यू; आज झाले अंत्यसंस्कार

निलज परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा,भुईसपाट झाला ऊस भरपाई ची होतेय मागणी

करमाळा पासून सात ते आठ किमी अंतरावर असलेल्या निलज गावात आज दुपारी दोन वाजता सुसाट्या च्या वाऱ्यासह जोरदार व मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे .त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे .उसाची पिके पूर्णतः भुईसपाट झाली असून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने येथील बळीराजाचे कंबरडे मोडले असल्याचे दिसून येते आहे.

संपूर्ण कठीण उन्हाळ्यात हे उसाचे पीक संभाळले असल्याचे आताच्या ह्या नुकसाईने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळत आहेत .
या परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्या उसाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी निलज येथील ऊस उत्पादक जयदीप गायकवाड यांनी केली आहे .

litsbros

Comment here