करमाळाधार्मिक

कोरोनानंतरची पहिली हनुमान जयंती करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनानंतरची पहिली हनुमान जयंती करमाळा तालुक्यातील केत्तुर येथे उत्साहात साजरी

केतूर ( अभय माने ) केत्तुर (ता. करमाळा ) येथील श्री. हनुमान जयंती उत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.. गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे पार्श्वभुमी मुळे सप्ताह, उत्सव, सभा, समारंभाना बंदि होती, आज सर्व नियम शिथिल झालेमुळे मौजे. केत्तुर नं-२ येथे हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.

या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सप्ताहाचे आयोजन केलेले होते.. यावेळी सात दिवस भक्तीमय वातावरणात किर्तन, भजन, प्रवचन सेवा पार पडली. या जयंती सप्ताह सोहळ्याची फार जुनी परंपरा असुन, हा मारूती पुनर्वसन होताना जुन्या पोमलवाडी रेल्वे स्टेशनवरून या ठिकानी आणण्यात आला आहे.

या ठिकाणचे सर्व भाविक भक्त भक्तीभावाने हा सोहळा साजरा करतात.. हा मारुती नवसाला पावतो अशी अनेक येणाऱ्या भाविकांकडुन ऐकायला मिळते, व ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

येथील मुर्ती ही दगडी आणि लाल शेंदूर असलेली आहे… या ठिकाणचे सर्व संयोजन हनुमान मित्र मंडळ व देवस्थान उत्सव समिती करते.

या ठिकाणी ह. भ. प दिलिप खैरे, ह. भ. प क्रांतिसिंह महाराज खाटमोडे पाटील, ह. भ. प जाधवर महाराज, ह. भ. प महेश येवले महाराज, लक्ष्मण खैरे, महादेव नगरे, संजय हुलगे, महादेव ढवळे, अशोक साळवे, तुकाराम खाडे, विशाल नगरे, नवनाथ पानसरे यांचे नियोजनाने कार्यक्रम पार पडतो.

यासाठी नियोजन समितीचे सदस्य सुर्यकांत भाऊ पाटील,राजेंद्रसिंह ऊर्फ अशोक पाटील, हनुमंतशेठ नवले, सुहासशेठ निसळ, अॅड. अजित विघ्ने, विवेकशेठ निसळ, राजुशेठ कटारिया, पंडित माने, पत्रकार राजाराम माने, रफिक बागवान, निवास उगले, राजाराम ठोंबरे, डॉ. जिनेंद्र दोभाडा, डॉ. निनिशचंद्र रॉय, डॉ.चंद्रकांत पाटील, डॉ. दिलिप कुदळे, नंदुशेठ जोशी,

बाबा मोरे, बाळासाहेब जरांडे, महेशशेठ महामुनी, हरिश्चंद्र जाधव,दत्ता गिरंजे, दादा नवले, सुधाकर पाटील, सलिम शेख, अनिल सोनवणे, संतोष गायकवाड, विजय रोंगे, ज्योतीराम ढवळे, सुनील खाडे, अंकुश मगर, विश्वास खैरे, पत्रकार रविंद्र विघ्ने, वामन महाराज खाटमोडे, हनुमान जोशी, व ज्ञात अज्ञात ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभते.

litsbros

Comment here