करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने करमाळयात गरजु नागरिकांना धान्य कीट वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने करमाळयात गरजु नागरिकांना धान्य कीट वाटप

करमाळा(प्रतिनिधी) ; हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही रमजान ईद निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवा नेते अमीरशेठ तांबोळी यांच्या शुभहस्ते करमाळा शहर व तालुक्यात 500 कीट चे वाटप घरपोच करण्यात आले. यावेळी वाजीद शेख जमीर सय्यद हाजी फारूक बेग फारूक जमादार सद्दाम शेख जाॅटी पठाण आदी जण उपस्थित होते.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील शिक्षक कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी मैदानात; वर्गणी करून उभे केले तब्बल 7 लाख

रमजान ईद झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात लाॅकडाऊन करावा; करमाळयातील ‘या’ मुस्लिम नेत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी

यावेळी बोलताना तांबोळी म्हणाले की आम्ही हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने समाजाची बांधिलकी म्हणून वर्षभरात अनेक गरजूंना मदत करण्याचे काम केले असुन लाॅकडाऊन च्या काळातही तीन वेळा धान्य किराणा मालाचे वाटप केले असुन मास्क सॅनिटायझर चे वाटप केले आता रमजान ईद निमित्त समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट घरपोच वाटप करण्यात आले आणि यापुढे ही ट्रस्टचे वतीने सामाजिक उपक्रम राबवु असे ते यावेळी म्हणाले.

litsbros

Comment here