करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीबाबत नेत्यांचे ४७ दावे; गावागावात तरुणाईने मारलीय बाजी; वाचा कोणत्या गटाने किती ग्रामपंचायतीवर केला दावा?
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील आज झालेल्या एकूण 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाच्या विजयावर माजी आमदार नारायण आबा पाटील आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार जयंतराव जगताप तसेच बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल हे सर्व नेते आमच्या ग्रामपंचायत निकाल सर्वाधिक लागले असल्याचे दावे करत आहेत .
तसेच आमच्याच गटाचे सरपंच झाले असल्याचे दावे करत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. आज झालेल्या एकूण निवडणुकीच्या निकाल पाहता गाव पातळीवरील स्थानिक तरुण युवा कार्यकर्त्यांनी आपला गट तयार करून विजय मिळवला आहे.
मात्र वरिष्ठ पातळीवरून राजकीय पुढारी आमच्याच गटाचे विजय झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच आमदार संजय मामा शिंदे व बागल गटाच्या नेत्या रशमी बागल यांनी खालील प्रमाणे सरपंच पदावर आपले सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणत आहे.
माजी आमदार नारायण आबा पाटील गटाने एकूण 20 ग्रामपंचायतीवर तर आमदार संजय मामा शिंदे यांनी 15 ग्रामपंचायतीवर याशिवाय बागल गटाने 12 ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आल्याचे विजयाचे दावे केले आहेत .
एकंदर पाहता सध्यातरी निवडणुकीच्या निकालाचा कल पाहता माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच बागल गटाच्या युवा नेते रश्मी बागल यांच्या बागल गटाने या दोन्ही गटाने सर्वाधिक जागा जिंकल्याचे राजकीय वर्तुळात सध्या बोलले जात आहे.
त्या खालोखाल आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या संयुक्त युतीने यांनी देखील स्थानिक पातळीवर युती करून विजयाची घोडदौड करीत विजयाची बाजी मारली आहे
Comment here