करमाळावांगीसोलापूर जिल्हा

आवाटी ग्रामपंचायत मध्ये सविचारी विकास पॅनलला घवघवीत यश; निकाला बाबत सगळ्यांचे दावे प्रतीदावे; वाचा आज निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींची स्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटी ग्रामपंचायत मध्ये सविचारी विकास पॅनलला घवघवीत यश; निकाला बाबत सगळ्यांचे दावे प्रतीदावे; वाचा आज निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींची स्थिती

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये सर्वच गटाने विजयाचे दावे प्रति दावे केले आहे करमाळा तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद गटातील नव्यानेच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते.

यामध्ये वांगी 1 मध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या वांगी नंबर एक मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या गटाने सात जागा मिळवले असून माजी आमदार नारायण आबा पाटील गटाने चार जागा मिळवल्या आहेत.

तर वांगी नंबर 2 मध्ये माजी पंचायत समिती सदस्य तसेच माजी आमदार जयंतराव जगताप गटाचे समर्थक रोहिदास सातव यांच्या शिंदे जगताप गटाच्या पॅनलने सहा जागा मिळवल्या असून या ठिकाणी नारायण पाटील गटाला तीन जागा मिळाल्या आहेत.

तर वांगी नंबर तीन मध्ये संजय मामाच्या गटाला पाच जागा मिळाल्या असून नारायण पाटील गटाला चार जागा मिळाल्या आहेत तर भिवरवाडी ग्रामपंचायत मध्ये बागल गटाला पाच तर मामाच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहेत या गटामध्ये मोहिते पाटील व पाटील गटाला काही अंशी प्रमाणात धक्का बसला आहे.

वांगी नंबर 1 मध्ये निळकंठ देशमुख यांच्या पॅनेलचे विठाबाई भोसले, हरिभाऊ तकीक, अमोल दैन, सोमनाथ ढावरे, शुभांगी देशमुख, नरसिंग देशमुख, सुरेखा दिवटे व पाटील व मोहिते पाटील व माजी आमदार नारायण आबा पाटील समर्थक गटाचे शहाजी देशमुख यांच्या पॅनेलचे दत्ता देशमुख, मनिषा गायकवाड, शुभांगी ढावरे व शारदा देशमुख हे विजयी झाले आहेत.

वांगी नंबर 3 मध्ये माजी आमदार जयंतराव जगताप यांचे समर्थक तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास सातव व जिल्हा परिषद माजी सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या संयुक्त रित्या लढवलेल्या जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनेलने घवघवीत यश मिळवले आहे

यामध्ये विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे विलास ढाणे, गीतांजली देशमुख, जयश्री भानोसे, सुरेश जाधव, पूजा चौधरी, सोनाली तकिक यांचा विजय उमेदवारांमध्ये समावेश आहे वांगी नं ३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे व बागल गटाच्या युतीची एकहाती सत्ता आली असुन‌ पाटील गटाला चार जागा मिळाल्या आहेत.

 

वांगी नं ३ मध्ये मयुर महादेव रोकडे,चंद्रकांत लक्ष्मण कदम,शंकर भिमराव जाधव,रोहिणी सोमनाथ रोकडे,सुवर्णा संतोष कांबळे विजयी झाले आहेत जिल्हा परिषद वांगी गटामध्ये संजयमामा शिंदे गटाने व बागल गटाने चांगले यश मिळवले असुन वांगी गटात पाटील गटाने देखील स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवून एकाकी कडवी झुंज दिली आहे.

तर एकेकाळी आवाटी येथील माजी आमदार जयंतराव जगताप गटाची सत्ता असणाऱ्या आवाटी ग्रामपंचायतीवर पाटील- बागल जगताप युतीला सहा जागेवर तर आमदार संजय मामा शिंदे गटाला तीन जागेवर विजय मिळवता आला आहे.

आवाटी येथील विजयी उमेदवार-

1)तबसुम साबीर खान
2) तन्वीर आदम शेख
3) आशा सुरेश शिंदे
4) परवीन जिगर खान
5) जयश्री गोकुळ नलवडे
6) गोपीनाथ रामभाऊ सोनवर
7) फकृद्दीन नबी खान
8) अजिनाथ यशवंत शिंदे आणि
9) सोयराबाई अशोक हराळे

तर सातोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहिते पाटील समर्थक अमरजीत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सातोली ग्रामविकास आघाडीला चार जागा तर आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या आहेत.

तर तालुक्यातील वडशिवणे, वांगी ४ व भिवरवाडी ग्रामपंचायतीवर बागल गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे.

वडशिवने येथे जगताप विरुद्ध बागल गटात 9 जागांसाठी लढत झाली. त्यात बागल गटाला 7 तर जगताप गटाला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.

वांगी नंबर 4 व भिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये बागल गटाचे वर्चस्व राहीले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार समीर माने यांनी काम पाहिले तसेच आवारात मोजणीच्या वेळेस पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता

litsbros

Comment here