करमाळा गोपालन संस्थेत गाईंची पूजा करून पोळा सण उत्साहात साजरा

करमाळा गोपालन संस्थेत गाईंची पूजा करून पोळा सण उत्साहात साजरा

करमाळा(प्रतिनिधी); आज गुरुवार दिनांक 14-9-2023 वार गुरुवार रोजी तपश्री प्रतिष्ठान संचलित गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था करमाळा येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 90 गाईंची पूजा करून पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना गोपालन संस्था चे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी गोशाळे च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत च्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. या वेळेस बोलताना ह. प. भ. अमोल महाराज काळदाते यांनी जीवनात गाईंचे महत्व या विषयी माहिती देऊन श्री खाटेर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कार्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले.

या वेळेस संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल परेशजी रतनचंदजी दोशी तसेच मनोज जी कांतीलालजी पितळे यांचा गो- मातेच्या सहवासात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच धीरज सोळंकी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी उपस्थित संपतनिकांच्या हस्ते गो – मातेची पूजा करण्यात आली. तसेच सर्व गाईना उपस्थितानी पोळ्याचा व गुळाचा नेवेद्य खाऊ घालून पोळा सण उत्साहात साजरा केला.

यावेळेस गाईना सजवण्यासाठी व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, पोपट राव काळदाते, प्रीतम राठोड, शशी अप्पा ननवरे, गिरीश शहा, काळदाते परिवार यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा – आजी आजोबांच्या लक्षणीय उपस्थितीत जि.प. शाळा पोथरे येथे ‘आजी-आजोबा दिन’ साजरा

करमाळा तालुक्यातील 87 कामांसाठी 10 कोटी निधी मंजूर; उर्वरित 221 कामांसाठी 36 कोटी निधीची मागणी, वाचा सविस्तर

या कार्यक्रमासाठी नगरसेविका संगीता खाटेर, सौं विजया मुनोत, सौं शामला कोठारी,सौं वैशाली गुगळे,मोक्षा खाटेर, विजया कोठारी, सौं काळदाते, यांचे सह गो- सेवा समितीचे प्रकाशजी मुनोत,जगदीश शिगची,कचरू लाल मंडलेचा,रसिक मुथा,संजय शा. कोठारी,जीवन भाई संचेती,नितीन दोशी, वैभव दोशी, दिनेश मुथा, गणेश बोरा, केतन संचेती आदी सदस्य यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दोशी, अनुप दोशी, पिंटूशेठ गुगळे,प्रीतम लुंकड, धीरज सोळंकी, सुशील कात्रेला,

संदीप पवार, बंडू दोशी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. संकेत खाटेर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line