करमाळा येथे गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजला मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू

करमाळा येथे गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजला मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू

करमाळा (अभय माने) संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली असून यामध्ये 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे
मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे
अशी माहिती कॉलेजची प्राचार्य सोमनाथ जाधव यांनी दिली आहे

करमाळा तालुक्यातील शिक्षणाची द्वारे खुले करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे
वैद्यकीय समन्वयक दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नर्सिंग कॉलेज सुरू होत आहे

यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सायन्स कॉमर्स आर्ट या कोणत्याही विभागातून बारावी पास झालेला विद्यार्थी असावा
हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असून
ही पदवी प्राप्त झाल्यानंतर 100 टक्के विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा – श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीची उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी

प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीजपूरवठा आठ तास करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – युवानेते शंभूराजे जगताप-संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती 

यानंतर या पुढील काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शिक्षण करमाळ्यात उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे प्राध्यापक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

या नर्सिंग कॉलेजमध्ये 40 विद्यार्थ्यांचा कोटा मंजूर झाला असून पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत नवीन कॉलेज चालू करणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव दीपक पाटणे यांनी दिली आहे.

karmalamadhanews24: