करमाळाधार्मिक

कारोना लॉकडाऊन नंतर यंदा करमाळा शहरासह तालक्यातील ग्रामीण भागात गणरायाचे जल्लोषात स्वागत ; भक्तिमय वातावरणात सारे दंग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कारोना लॉकडाऊन नंतर यंदा करमाळा शहरासह तालक्यातील ग्रामीण भागात गणरायाचे जल्लोषात स्वागत ; भक्तिमय वातावरणात सारे दंग

केत्तूर (अभय माने) : गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आज केत्तूर (ता. करमाळा) व परिसरातील सार्वजनिक, बाल गणेश तसेच घरगुती गणेश भक्तांनी गणरायाचे उत्साहात आगमन केले.

गणरायाचे स्वागत करताना बच्चे कंपनी

गेल्या दोन वर्षापासून असलेली कोरोनाची लाट ओसरल्याने व यंदा सर्व निर्बंध क्षिथिल करण्यात आल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात व जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.

आले रे आले गणपती बाप्पा आले… चा जयघोष करीत आज दुपारी दोन वाजेपर्यंत गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त असल्याने गणेश भक्तांची गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग दिसून येत होती.

परिसरात यावर्षी बाल गणेश मंडळांची संख्या वाढली आहे त्यांचा आनंद व उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर यावर्षी गणेश मूर्ती ही अनेक व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या.

एवढ्या मूर्ती पाहून त्या शिल्लक राहतील असा अंदाज होता परंतु सर्व विक्रेत्यांकडे गणेशमूर्ती सायंकाळपर्यंत संपल्या होत्या.

विक्रेत्यापासून सर्वांनीच डॉल्बी ढोल ताशाच्या गजरात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या.यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.

litsbros

Comment here