करमाळा तालुक्यात घरोघरी गौराई चे उत्साहात आगमन; पूजा साहित्याचे दर मात्र वधारले
केत्तूर ( अभय माने)शनिवार (ता. 3 ) रात्री 10.56 मिनिटापर्यंत असल्याने सायंकाळनंतर घरोघरी गौरीचे आगमन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. गौरी हा सण तीन दिवसांचा असतो तो घरोघरी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे भोजन तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते.
गौरी गणपती हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या पारंपारिक व धार्मिक पद्धतीने साजरा होतो परंतु यावर्षी या सणाला महागाईचे ग्रहण लागले आहे. सजावटीचे तसेच इलेक्ट्रिक साहित्य मोठ्या प्रमाणात महाग असल्याने अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून आले.
मिठाईला मागणी —
गौरी सणासाठी घरी मिठाई करण्यापेक्षा रेडिमेड मिठाई आणण्यावर भर देण्यात आला असल्याचे दिसून आले. यामध्ये लाडू, जिलेबी, मैसूरपाक, बालुशाही, करंजी,फरसाण आदी महत्त्वाच्या पदार्थांना मागणी होती.
पूजा साहित्याचे दरही वधारले
फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे .पूजा साहित्याचे दर 15 ते 20 टक्केनी वाढले आहेत त्यासोबतच गुलाल, खडीसाखर, खोबरे, खोबराकीस, खारीक, बदाम, लाल सुपारी, हळदीकुंकू, रांगोळी भ आदिंच्या दारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Comment here